युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी :
सावंतवाडी शहर रोगराईपासून मुक्त ठेवण्यासाठी वाढत्या डासांच्या पार्श्वभूमीवर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रांताधिकारी हेमंत निकम यांची भेट घेऊन सूर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये डास निर्मूलन मोहिमेसाठी नवीन फॉगिंग मशीन उपलब्ध नसल्याने मोहीम राबविण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी आवश्यक असलेल्या मशीन तात्काळ खरेदी केल्या जातील असे आश्वासन प्रांताधिकारी तथा प्रशासक हेमंत निकम यांनी दिले होते. याबाबत तात्काळ कार्यवाही झाल्यामुळे रविवारी नगरपालिकेमध्ये डास निर्मुलन मोहीमेसाठी दोन हँण्डल मशीन्स व मोठ्या २ फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता सावंतवाडी वासियांची डासांपासून मुक्तता होणार असून शहरात उद्या सोमवारपासून डास निर्मूलन फवारणी करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी दिली.