You are currently viewing सत्तेत नसलो तरी, व्हिजन ठेवून देवगड, कणकवली, वैभववाडीचा विकास केला – आ. नितेश राणे

सत्तेत नसलो तरी, व्हिजन ठेवून देवगड, कणकवली, वैभववाडीचा विकास केला – आ. नितेश राणे

सी-वर्ल्ड, नाणार प्रकल्प होण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाच्या पाठीशी उभे रहा….

सिंधुदुर्गनगरी
सिंधूर्गात प्रस्तावित असलेला सी वर्ल्ड प्रकल्प, पंचतारांकीत पर्यटन प्रकल्प, विमानतळ आणि एमआयडी या रेंगाळत पडलेल्या प्रकल्पांना सरकारने चालना दिली, तरी हा जिल्हा विकासामधे मोठी झेप घेईल. नागरिकांच्या दरडोई उत्पनातही भर पडेल. जर आमच्या भारतीय जनता पक्षाला सत्तेची संधी मिळाली तर मालवण वायंगणी येथील सी वर्ल्ड व नाणार येथील ग्रीन रिफायनरी अणुऊर्जा प्रकल्प नागरिकांना विश्वासात घेऊन त्याच ठिकाणी होतील, अशी ठाम ग्वाही देवगड कणकवली वैभववाडीचे आम. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना दिली. मुख्यालय पत्रकार संघाने सोमवारी आ. राणे यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित केला होता.
देवगड कणकवली वैभववाडी या मतदार संघातील २६३ गावच्या जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीच्या पदासाठी मला संधी दिली. २३ आक्टोंबरला आता सहा वर्ष पुर्ण होतील. आम्ही विरोधी पक्षात असलो आणी सत्तेत संधी मिळाली नसली तरी देवगड कणकवली आणी वैभववाडी या तीनही शहर आणि तालुक्यांकडे विकासाचे व्हिजन ठेउन काम केले. देवगड तालुका अन्य तालुक्यांच्या तुलनेत गेल्या सहा वर्षांपूर्वी पर्यटनाच्या चर्चेत आणि पर्यटन विकासामध्ये मागे होता मात्र त्याला या भागाचा आमदार म्हणून पुढे आणण्यास काम केले आहे. सरकार काय मदत करेल हि वाट न बघत बसता या तालुक्याच्या पर्यटनावर मी विशेष भर दिला. व्हॅक्स म्युझियम, कंटेनर सिनेमा, वाॅटर स्पोर्टस हे सुरु करण्याबरोबरच पंचतारांकित असलेला क्लब महिंद्राचा हॉटेल प्रकल्प देवगडमध्ये आणत आहे. १६० एकरमध्ये हा प्रकल्प होणार आहे. या पर्यटनावर आधारित प्रकल्पामुळे मोठ्या संख्येने या तालुक्यात पर्यटक येतील आणि मोठी रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. या तालुक्यात फळबागायती आणि शेतीलाही प्राधान्यक्रम असून पर्यटन विकासामुळे याही क्षेत्राला उभारी मिळणार आहे. तसा प्रयत्न आपण सातत्याने करित आहोत.
सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, विनोद दळवी, नंदकुमार आयरे, लवू म्हाडेश्वर, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद परब, सतीश हरमलकर, प्रसाद पाताडे संजय वालावलकर, रवी गावडे आदी मुख्यालयातील पत्रकार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =