*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अभंग रचना*
*भोळा वारकरी*
देखता पंढरी |तृप्तता लोचनी
संकट मोचनी | भक्तांसाठी ||१||
विठ्ठल विठ्ठल |करावे भजन
नामसंकीर्तन| सावळ्याचे ||२||
अगाध महिमा| पवित्र पंढरी|
भोळा वारकरी|भक्ती लीन ||३||
मुखी सदा नाम | हाती आहे कर्म |
सदाचार धर्म | आचरणी ||४||
भोळा भाव मनी| चित्ती समाधान|
एकमेका मान | वंदुनिया ||५||
अहंभाव सारे| जाती विस्मृतीस|
पाहता मूर्तीस| विठ्ठलाच्या ||६||
नको काही अन्य |घडो विठू सेवा|
हेच दान देवा |अरुणास ||७||
🙏🏻🍃🌷🍃🙏🏻🍃🌷🍃🙏🏻
अरुणा दुद्दलवार
दिग्रस यवतमाळ @✍️