You are currently viewing स्मृति भाग ४८

स्मृति भाग ४८

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४८*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

काल आपण ज्या सूक्तांची नावे पाहिली , त्याला मी पण अनभिज्ञ होतो ! तर ब्राह्मण आणि ब्राह्नणेतर द्विजांची काय अवस्था आहे ? हे सहज लक्षात येईल !! म्हणूनच चार ही वर्णांच्या समावेशासाठी सर्वसाधारण श्लोकांची निर्मिती झाली . पण आज अंघोळीचा घोळ असा आहे की कुणाला श्लोक म्हणायलाच वेळ नाही ! कशा कळतील माझ्या भारताच्या सीमा ? ही एका श्लोकाची गोष्ट आहे तर इतर श्लोकांची ताकद काय असावी ? श्लोक वा सुभाषितांचा अभ्यास पूर्ण भारतीयांनी केलाच पाहिजे .

आता थोडे *”अमरत्वा”विषयी* . या जगात कोण अमर झालाय ? अहो राम , कृष्ण हे सुद्धा या जगातून सामान्य माणसासारखे जन्माला आले व सामान्य माणसासारखे निघून गेले . मग अमर कोण ? हं एक अश्वत्थाम्याचं नाव सगळे नावाला घेतात व त्याचे पुरावे ही गोळा करत टीव्हीचे पत्रकार सुद्धा फिरतात . तसा भारत हा चमत्काराची परिसीमा असणारा देश आहे . ते पहायचे असतील तर इंग्रज लेखक पॉल ब्रंटनचे भारतीय भाषांतराचे ” भारतीय रहस्याच्या शोधात ” हे पुस्तक वाचनीय आहे . ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाभाडे काढण्यासाठी पुरेसे आहे असे वाटते !! असो . एक श्लोक येतो अमरत्वाचे संदर्भात , त्याला आपण *”चिरंजीवीत्व”* संबोधतो .

 

*अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः ।*

*कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥*

अश्वत्थामा , बलि , व्यास , हनुमान , बिभीषण , कृपः , आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत .

सर्वात प्रथम की यात बळी , व्यास व हनुमान हे ब्राह्मण नाहीत बरं !

मग हे अमर कसे ? तर सर्व स्वाध्यायींचे हृदयस्थ प.पू. दादांचे प्रवचनातून कळले की *” ज्यांचा मृत्यु इतिहासाला कळला नाही , कसा झाला ते ! वा ज्यांच्या मृत्युची दखल इतिहास घेवू शकला नाही वा ज्यांच्या मृत्युची नोंद इतिहास ठेवू शकला नाही , ते चिरंजीव ! “* यानुसार आज नेताजी सुभाषचंद्र बोस व मुंबई चौपाटीवर सयाजीराव गायकवाडांचे समोर पहिले विमानाचे मॉडेल रिमोटने उडवणारा शिवाकर तळपदे — हे ही मला चिरंजीवच वाटतात ? ठीक आहे .

पण या चिरंजीवांनी नंतर आपली स्वतःची ओळख विसरत भारतीय संस्कृतीचे कार्यात स्वतःला इतके झोकून दिले की समाजही यांचा मृत्यु विसरावा , म्हणून चिरंजीव !!!! आणि बळी हा राक्षस , हनुमान हा वानर व कृप आणि अश्वत्थामा हे आसुरी विचारी दुर्योधनाकडून लढणारे !!!! पण यांनी शेवटी संस्कृतीकार्य केले म्हणून ते चिरंजीव !!!

दुसरी एक संकल्पना अमरत्वाची ! आमच्या संस्कृतीत सप्तर्षींनी येवढे कार्य केले की ते नक्षत्रात जावून बसले अन् अमर झाले ! बाळ धृवाने येवढे काम केले की तो धृवतारा बनून राहिला ! अगस्तिचा तारा बघतांना वा शुक्राची चांदणी बघतांना वा तो शब्द कवितेतून वा लावणीतून ऐकतांना किती मजा येते ना ? भाऊ असावा तर भरतासारखाच ! राम , कृष्ण , भीष्म , द्रोण , हनुमान , अर्जुन ही तर अमरत्वाची अजूनही जिवंत उदाहरणेच !! *रामबाण , रामलीला , रामवचन , सीताराम , भीष्मप्रतिज्ञा , गुरु द्रोणाचार्य , बलभीम , हनुमान उडी , कृष्णलीला , मेघश्याम , श्यामसुंदर , कृष्णनीति , राधेकृष्ण , भीमटोला , दानवीर कर्ण , मारुतिराया , हनुमानदास्यत्व , धर्मवचन ( युधिष्ठिराचे दुसरे नाव धर्म ) , पार्थसख्यत्व , हे शब्द अजरामर आहेत ना जगाच्या इतिहासात ? काय केलं असेल ? कसे वागले असतील ही माणसे ? येवढा जाज्वल्य इतिहास असून आमच्याच हरामखोरांचे आम्हालाच प्रश्न ?? कसा माझा देश नावलौकिकास येईल ?? कशी माझी संस्कृती टिकेल ? आम्ही एक व्हायलाच हवे !!! पर्याय नाही दुसरा ?

एक तिसरी संकल्पना अमरत्वाची वा तिसरा दृष्टिकोन अमरत्वाचा ! आम्ही सत्यनारायण कथेत वा सावित्रीचे कथेत वणिकाचे वा सत्यवानाचे प्राण वाचल्याचे ब्राह्मणांकडून ऐकतो . पण यावर शिंतोडे उडवणार्‍या समुदायास माझे एक सांगणे आहे की , १)तो काळ पूर्वीचा होता , २) ज्यांचे प्राण वाचले ही चातुर्वर्णव्यवस्था पाळणारी माणसे होती , ३)पर्यायाने ती गुरुकुलातून शिकलेली असावी ! , ४)साहजिकच आमच्या ऋषिंनी सांगितलेली स्नानसमयाची सूक्ते वा इतर अमरत्वाची सूक्ते ती कटाक्षाने रोज म्हणत असावीत ! ५)मग *अकाली येणारा मृत्यु टळणे हे काही काळापुरते आलेले अमरत्व नाही का ?* , ६)अकाल मृत्युहरणाचे वा टळण्याचे जिवंत उदाहरण *मी आपल्या सर्वांसाठी लेख लिहितोय !*

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा