शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी साजरा केला कुटुंबियां सोबत वाढदिवस
सावंतवाडी
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्री केसरकर यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी केक कापून हा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा केला.
यावेळी मंत्री केसरकर यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून अभीष्टचिंतन करण्यात आले.
मंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसापूर्वीच आपण वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार नाही, येथील शेतकऱ्यांचे पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करणे योग्य नाही असे जाहीर केल होते. त्यामुळे आज ते वाढदिवसाला सावंतवाडीत हजर नव्हते, मात्र शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला.मात्र केसरकर यांनी आपला वाढदिवस मुंबई येथे छोटेखानी साजरा केला.