You are currently viewing मंत्री बनण्यासाठी वाजपेयींची भाषणे मला प्रेरणादायी ठरली – सुरेश प्रभू

मंत्री बनण्यासाठी वाजपेयींची भाषणे मला प्रेरणादायी ठरली – सुरेश प्रभू

अणाव येथे स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन…

ओरोस
मी कॉलेजला असल्या पासून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकूण मोठा झालो आहे. स्वप्नातही वाटले नव्हते मंत्री बनून त्यांच्याच बाजूला बसेन. पहिला खासदार झाल्यावर ती संधी मिळाली. वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान यांच्यात दोन साम्य आहेत. दोघांचेही देशावर आतोनात प्रेम आहे. दूसरे म्हणजे भारताला भविष्यात कशाची गरज आहे, हे ते जाणतात. तशाप्रकारे प्रत्येक्षात कृति करतात, असे प्रतिपादन रविवारी अणाव येथे बोलताना माजी केंद्रीय मंत्री खा सुरेश प्रभू यानी केले.
मानव साधन विकास संस्था संचालित अणाव येथील स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम खा सुरेश प्रभू यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून पार पडले. यावेळी अध्यक्षा उमा प्रभू, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, उपसभापती जयभारत पालव, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अणाव सरपंच नारायण मांजरेकर, प्रभाकर सावंत, मोहन होडावडेकर, मोहन कुशरे, सुधीर पालव, सुरेंद्र जैन, विजय मराठे, नकुल पार्सेकर, विलास हडकर, उमेश प्रभू, डॉ प्रशांत मडव, डॉ दर्शना कोलते, डॉ राजेश नवांगुळ, प्राचार्य ओमकार गरड आदी उपस्थित होते. डॉ दर्शना कोलते यानी ब्राम्हण साक्षीने सर्व विधी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा