You are currently viewing कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर

कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर

*कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर*

*मा.आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे* सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप* *बुधवार* दिनांक *06/03/2024* रोजी दु. *3.30* वाजता भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय — गवळी तिठा , सावंतवाडी येथे मा. *आम. राजन तेली* यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या प्रसंगी *श्री वामन तर्फे* (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) ,
*श्री.गुरुदास कुसगांवकर* सचिव; ,
*श्री.रामचंद्र घावरे* उपाध्यक्ष ,
माजी मुख्या. संघ जिल्हाध्यक्ष *मा. एम. जी. मातोंडकर* सर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सावंतवाडी तालुक्यातील ३५ हायस्कूल , वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल व दोडामार्ग तालुक्यातील १६ हायस्कूल अशा प्रकारे सावंतवाडी विधानसभेतील ६७ हायस्कूल व महाविद्यालयांना प्रोजेक्टर मंजूर केल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व संस्थाचालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकाऱी , सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन करण्यात येत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =