कणकवली
लोरे गावातील शिवगंगा नदीपात्रातील साळकोंड येथे महिला बचत गटाने श्रमदानातून बंधारा बांधला.राष्ट्रीय हरितसेना व समाजसेवा अंतर्गत बचत गटाला पाण्याचे महत्त्व विषद करण्यात आले.वैवाहिक जीवनात जडलेली श्रमदानाची सवय व परस्पर सहकार्यातून काम करण्याची भावना या सारख्या कार्यक्रमातून वृदिध्नगत होत असते.या बंधाऱ्याच्या माध्यमातून साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास व पर्यायाने पिण्याचे पाणी व शेतीस उपयोग होणार आहे.या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य श्री.मनोज रावराणे,गावचे सरपंच अजय रावराणे,माजी सरपंच श्री.सुमन गुरव,माजी उपसरपंच श्री.नरेश गुरव,श्री कृष्णा गुरव,श्री हरिचंद्र जाधव आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.