ठेकेदार कंपनीकडून अखेरच्या टप्प्यातील कामे हाती
कणकवली :
महामार्ग चौपदरीकरणाचे जिल्ह्यातील काम अंतिम टप्प्यात आलेली असतानाच आता ठेकेदार कंपनीकडून शेवटच्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आली आहेत. कणकवलीतील जानवली नदी पुलानजीक महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीकडून दिशादर्शक आणि अंतर दर्शवणारी कमान उभारण्यात आली आहे. या कमानीवर महत्त्वाच्या शहरांची अंतरे दर्शविण्यात आली आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील कामे ठेकेदार कंपनीकडून हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. कमानीवरील दिशादर्शक फलक लावण्यांच्या कामाकरिता काही वेळ महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.