You are currently viewing मा.लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा

मा.लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा

*उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस व रामदासजी आठवले यांची उपस्थिती*

 

अमरावती :

शनिवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी चार वाजता अमरावतीला श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भावनांमध्ये एक हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकाभिमुख व्यक्तिमत्व तसेच बिहार व केरळ येथे राज्यपाल राहिलेले स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या पत्नी मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.. सहस्त्रचंद्रदर्शन यानिमित्ताने आयोजित नागरिक सत्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कमलताईंचे पूर्ण आयुष्य सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि अध्यात्मिक कार्यात गेले आहे. पण मला सर्वात त्यांच्या दोन गोष्टी खूप आवडतात .त्या म्हणजे त्यांनी इगतपुरी येथे असलेल्या गोयंका गुरुजींची विपश्यनेची शाखा अमरावती जिल्ह्यातील छत्रीतलाव रोडवरील मोगरा येथे काढलेली आहे. हा त्यांचा उपक्रम माणसाला पुनर्जन्म देणारा आहे. आज लोक इतक्या ताण-तणावात राहतात .त्यासाठी मुक्तमार्ग म्हणजे विपश्यना .आजकाल विपश्यनेची खूप व्यावसायिक केंद्रे निघालेली आहेत ..पण कमलताईंनी स्वतःच्या आणि गवई साहेबांच्या तसेच त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून या विपशनेचा खर्च भागवण्याचा विडा उचलला आहे .दर महिन्यात होणारे विपश्यना शिबिर हे त्यांचे ध्येय आहे ..त्यासाठी होणारा पूर्ण खर्च त्या करतात आणि यामुळे गेल्या पंचवीस वर्षात अनेकांची आयुष्य उजळून निघालेली आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सुरू केलेला माहेर हा उपक्रम .त्यासाठी त्यांनी विपश्यना केंद्र समोरच माहेर संस्थेची स्थापना केलेली आहे. ज्या मुलीला आई-वडील नाहीत त्या मुलींनी निर्धास्तपणे कमलताईकडे यावे .कमलताई स्वतःच्या मुलीप्रमाण त्या मुलीचे स्वागत करतात .त्यांच्या पाहुणचार करतात. त्यांना साडी चोळी बांगडी देतात आणि माहेरपणाचा अनुभव देतात .आज सर्वत्र व्यावसायिकरण झालेले आहे . पर देशात गेलेली मुले बापांना विचारतपण नाहीत .आजारी असताना जर सोडा पण मृत्यूनंतरही त्यांच्या अंतयकर्मालाही येत नाहीत.पण ताईंनी माहेर हा उपक्रम सुरू करून खऱ्या अर्थाने आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये अमृत पेरले आहे. कमलताई साहेबांचा माझा परिचय जवळपास 50 वर्षापासून आहे .मी सामाजिक चळवळीमध्ये असल्यामुळे आणि त्यातही फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला वाहून घेतल्यामुळे मी सतत त्यांच्या संपर्कात आहे. माझे काम वेगळे आहे .मी मिशन आय ए एस चे काम करतो ..पण माझ्या प्रत्येक उपक्रमात कमलताई आवर्जून भाग घेतात ..सहभागी होतात आणि जिथे आवश्यक असेल तिथे मदतही करतात ..मिशन आय ए एस चे काम 365 दिवस चालते .ताईंना बोलावले आणि डायरीमध्ये तारीख खाली असली तर ताई नाही म्हणत नाहीत.मग तो कार्यक्रम कितीही का दूर असे ना .ताई स्वतःच्या वाहनाने त्या ठिकाणी पोहोचतात.

यावर्षी जी मुले केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा पास झाले त्या सर्वांचे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांचे सत्कार करण्याचा सुवर्णयोग कमलताईनी घडवून आणला . खरं म्हणजे आतापर्यंत अजून लोकप्रतिनिधी त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचे आहेत पण यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे .त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले आहे .अगदी काल-परवा असिस्टंट कमांडरच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला आलेला दर्यापूरचा आदित्य रवींद्र साबळे याचा पहिल्याच दिवशी सन्मान करण्याचा मान कमल ताईकडे जातो .त्याचप्रमाणे अकोला येथून कलेक्टर झालेले श्री ऋषिकेश ठाकरे अमरावतीहून कलेक्टर झालेले श्री क्षितिज गुरुभेले तसेच शेगाव रेल्वे येथून कलेक्टर झालेले श्री आशिष उन्हाळे या मुलांचा त्यांनी गौरव केलेला आहे .आपल्या भागातील मुलांनी कलेक्टरसारखी भव्य दिव्य परीक्षा उत्तीर्ण केली त्याची दखल इतर कोणी घेऊ की न घेवो कमलताईंनी मात्र आपली उपस्थिती दर्शविली आहे. खरं म्हणजे दादासाहेब गवई हा माणूस सदा सर्वदा समाजकार्यात वाढलेला .कमलताईंचे लग्न झाले तेव्हा त्यांच्यावर सामाजिक कार्यसाठी केलेल्या आंदोलनाच्या 100 केसेस होत्या .यावरून या तडफदार माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. पण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या हयातीत व त्यांच्या मृत्यूनंतर न्याय देण्याचे काम कमलताई प्रामाणिकपणे करीत होत्या .करीत आहेत आणि करीत राहणार आहेत. कमलताईची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी वाहून घेतलेले आहे. काँग्रेस नगर मधील अनेक झाडे त्यांनी लावलेली आहेत. सकाळी उठल्याबरोबर त्यांच्याकडे जो पाहुणा आलेला असेल त्यांच्या हस्ते सगळ्यात पहिले काँग्रेस नगरमध्ये वृक्षारोपण होते .ताई जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये झाडे ठेवलेली असतात. एवढेच नाही तर कोणत्याही संस्थेने कितीही झाडांची मागणी केली तर ताई स्वखर्चाने ती झाडे त्यांना पुरवतात. अमरावतीला वृक्ष संवर्धन समिती आहे .त्या समितीलाही ते वेळोवेळी मदत करतात. आज झाडाचे किती अनन्य साधारण महत्व आहे हे आपणा माहीत आहे .परवा कमल ताईंनी कुलगुरूंच्या उपस्थितीत अमरावतीच्या राजेंद्र गोडे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात शंभर झाडे लावली आणि आमचे मित्र आणि त्या कॉलेजचे डीन डॉक्टर उमाळे यांना सांगितले की मी अधून मधून ही झाडे जिवंत आहेत की नाही ते पाहण्यासाठी येणार आहे .डॉक्टर साहेब झाडांची काळजी घ्या .अशी प्रेमाची ताकीद देणाऱ्या ताईसाहेब म्हणूनच लोकप्रिय आहेत .ताईसाहेबांचा दुसरा गुण म्हणजे त्यांच्या परिचयाचा कोणताही माणूस कोणत्याही दवाखान्यात भरती असेल आणि ताई साहेबाला ते जर माहित पडले तर त्याचा जेवणाचा डबा काँग्रेस नगर मधील त्यांच्या घरून जातो .ती एक सवयच कमलताईंनी लावून घेतली आहे. आज जिथे ऋणानुबंध संपत आलेले आहेत ओढून काढून नाते जपली जातात. तिथे मात्र कमल त्यानी ही नाती वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालविलेला आहे. खरं म्हणजे लेडी गव्हर्नर म्हटल्यानंतर त्यांचा वावर वरिष्ठ अधिकारी श्रीमंत लोक मोठे राजकारणी यांच्यामध्ये असतो .पण कमलताई त्याला अपवाद आहेत. त्या तुम्हाला सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळलेल्या दिसतील .सर्वांना मंगल मैत्री देताना दिसतील .त्या स्वतः विपश्यनेच्या वरिष्ठ आचार्य आहेत .नुसतं विपश्यना करून त्या थांबलेल्या नाहीत तर त्या विपशयनेचा आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष करून कमलताईनी एक मोठी उंची गाठलेली आहे आणि म्हणून कमलताई आणि परोपकार हे समीकरण जुळून आले आहे. आपले चिरंजीव आज न्यायमूर्ती भूषण जरी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असले तरी त्यांचे बालपण गरिबीत गेलेले आहे. सर्वसाधारण शाळेमध्ये ते शिकलेले आहेत. ह्या गोष्टी कमलताई आवर्जून आपल्या भाषेमध्ये आपल्या भाषणात सांगतात. कमलताईंना आपल्या प्रारंभीच्या गरिबीची जाणीव आहे आणि म्हणून त्या सर्वांना घेऊन चालतात .अगदी लहानातला लहान प्रसंग असो त्या आठवणीने त्या कार्यक्रमाला जातात. आज त्यांनी वयाची 81 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मागे त्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नातीच्या लग्नाला मुंबईला गेल्या. मुंबईच्या रेल्वे स्थानकावर त्यांचा अपघात झाला. ऑपरेशन सक्सेसफुल झाले .पण काठी मात्र साथीला आली .पण काठी साथीला आली तरी त्यांचे सामाजिक कार्यात योगदान सतत राहिलेले आहे. आमचे मित्र श्री गोविंद कासट यांच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्या सहभागी होतात. आपल्या संस्थेच्या चाव्या त्यांनी केव्हाच आपल्या वारसांना देऊन टाकल्या आहेत. आज अमरावती शहरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांच्या उल्लेख करावा लागेल. सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या आईसाहेब आज 81 वर्ष पूर्ण करीत असल्या तरी त्यांची काम करण्याची पद्धत ही आजही अनुकरणीय आहे .सकाळी सहा वाजल्यापासून त्या घराबाहेर पडतात. सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात .कोणाचे लग्न असो कोणाकडचा दुःखद प्रसंग असो त्यामध्ये सहभागी होतात. परवा त्यांच्याबरोबर चांदूर बाजारला लग्नाला जाण्याचा योग आला .त्या आई-वडिलांना इतका आनंद झाला की तो शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. आमच्या मिशन आय ए एसच्या कार्यक्रमातही त्या आनंदाने येतात. जवाहर नवोदय विद्यालय असो की पोतदार इंटरनॅशनल स्कूल असो आईसाहेब न्यायमूर्ती भूषण साहेब कसे घडले हे सांगतात आणि मुलांना प्रेरणा देण्याचे काम करतात. असे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व .या व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊन नागपूरचे आमचे ज्येष्ठ मित्र श्री गिरीश गांधी यांनी तसेच अमरावती येथील माजी मंत्री श्री सुनील देशमुख व त्यांच्या मित्र परिवाराने अमरावतीला या समाजसेवी व्यक्तिमत्त्वाच्या सहस्त्र चंद्र दर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे .या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय कमलताई गवई यांना हार्दिक शुभेच्छा..!

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा