You are currently viewing कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.

संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष देवेंद्र सामंत यांची माहिती.

कुडाळ
तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काल पार पडलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र सामंत यांनी दिली. कालच या संदर्भातील बैठक तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे पार पडली या बैठकीत कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच विधवा निराधार महिला भगिनींचे एकूण १८८ प्रस्ताव दाखल झाले होते यावर या बैठकीत विचारविनिमय करून सर्वच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. कुडाळ तालुक्यातील एकही निराधार बांधव या लाभापासून वंचित राहू नये यासाठी अद्यापही ज्या निराधार बांधवांनी या योजनेसाठी प्रस्ताव सादर केला नाही त्यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. देवेंद्र सामंत यांनी केले? या बैठकीसाठी तहसीलदार श्री. विरसिंग वसावे, श्रीमती ठाकूर, कुडाळ अ. गटविकास अधिकारी श्री. श्याम चव्हाण, संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य श्रीमती. अदिती सावंत, श्रीमती. सायली कुडाळकर, श्री. वृनाल कुंभार, श्री. संदेश उर्फ भास्कर नाईक, श्री. अनिल शिंगाडे, श्री. गोपाळ हरमलकर, श्री. राकेश नेमळेकर, श्री. चंदू वालावलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा