बांदा :
मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण आज सोमवार दिनांक १२ मे रोजी दुपारी २.०० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. गेली दोन वर्ष उडानपुलाचे काम सुरू होते. उड्डाणपूल पूर्ण झाल्याने शहरातील, चौकात होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. तसेच अपघातांची मालिका देखील थांबणार आहे. दोन वर्षात या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे उद्घाटन होऊन त्यांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी कार्यक्रमासाठी विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.