करूळ येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिसाद…
वैभववाडी तहसीलदारांची संकल्पना; २८ विद्यार्थ्यांना दाखले वाटप…
वैभववाडी
विद्यार्थ्यांना वेळेत शासकीय दाखले मिळावे यासाठी करूळ येथे राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत २८ विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, करुळ सोसायटी चेअरमन दिगंबर पाटील, मुख्याध्यापक दीपक घाटगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, माजी उपसरपंच महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य विलास गुरव, रेखा सरफरे, अव्वल कारकूर कांचन मांजरेकर, सौ. पुजारे, सेतू सुविधा केंद्राचे प्रमुख शैलेश सुर्वे, महा-ई-सेवा केंद्राचे प्रमुख अजय कर्पे, श्री. विटेकर, ग्रामसेवक शशिकांत गुरव, तलाठी युवराज पाटील, वैभव पाटील, नागेश पांचाळ, दत्तराम पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.