You are currently viewing सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँड वरील प्रसाधनगृह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करणार – सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान

सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँड वरील प्रसाधनगृह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करणार – सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान

सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँड वरील प्रसाधनगृह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करणार – सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज सावंतवाडी वेंगुर्ला स्टॅन्ड च्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
प्रसाधनगृहाच्या परिसरात वाढलेली झाडे झुडपे, कुजलेले भाज्या- फ्रुट, काचेच्या फुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या तसेच चिखल सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी न कंटाळता स्वतः हात घालून साफ केला. तसेच कित्येक दिवस बंद असलेले प्रसाधनगृह तत्काळ सुरू करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने ठोस पावले उचलली आहेत. ऐन पावसामध्ये बंद असलेले प्रसाधनगृहाचा विपरीत परिणाम बस स्टॅन्ड वरील प्रवासी महिला, विद्यार्थी,डायबिटीस पेशंट,ज्येष्ठ नागरिक व त्या परिसरातील व्यावसायिकांवर होत आहे. प्रसाधनगृह बंद असल्याकारणाने नाईलाजास्तव डायबिटीस पेशंट व ज्येष्ठ नागरिकांना प्रसाधनगृहा बाहेर उघड्यावरच लघवी करण्याची वेळ येत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आज सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या परिसराची साफसफाई करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीने पुढाकार घेऊन केलेल्या कामाची पोच आगार व्यवस्थापक व सावंतवाडी मुख्याधिकारी यांना सुपूर्त केली आहे.
प्रसाधनगृहामध्ये ज्या काय त्रुटी व दुरुस्ती आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रसाधनगृह सुरू झाल्यानंतर सदर प्रसाधन गृह नेहमीच स्वच्छ व कायम स्वरूपी सुरू राहावं यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एका स्वच्छता दूतची नियुक्ती करण्यात येणार आहे व त्याला दर महा मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील व्यावसायिक मनवेल डिसोजा यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
सामाजिक बांधिलकीचा हा स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजू मसुरकर तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर व सफाई कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, हेलन निबरे, रूपा मुद्राळे सुजय सावंत व शामराव हळदणकर यांनी सहभाग घेतला होता .

प्रतिक्रिया व्यक्त करा