You are currently viewing तेजस कदम चे अभिनंदनीय यश…

तेजस कदम चे अभिनंदनीय यश…

कसाल येथील प्रथितयश उद्योजक इंजी.संतोष कदम आणि व डॉ. श्रेया कदम यांचा सुपुत्र तेजस कदम याने अमेरिकेतील कोल्याराडो ऑफ बोल्डर या सुप्रसिद्ध मॅनेजमेंट स्टडी मधील युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या स्थापत्य इंजिनिअरिंग मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील परीक्षेत युनिव्हर्सिटी मध्ये उत्तीर्ण होवून पहिला येण्याचा मान मिळविला .
ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूल मध्ये दहावी पर्यंत शिक्षण घेताना दहावीच्या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता, त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे स्थापत्य पदविका व ठाणे येथील युनीवर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे स्थापत्य पदवी विशेष श्रेणीत प्राप्त केली होती.
अमेरिकेतील सुप्रसिद्ध कोल्याराडो ऑफ बोल्डर या युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून त्याने तिथे प्रवेश घेतला होता.
या युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्याने दोन वर्षाच्या विहित कालावधीत पूर्ण करताना स्कॉलरशिप मिळवून शिक्षणाचा खर्चही कमी केला होता, आणि अंतिम परीक्षेत त्याने युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. या दोन वर्षाच्या कालावधीत त्याने “कमवा आणि शिका” या भारतीय संस्कृतीनुसार मिळेल त्या ठिकाणी अर्धवेळ नोकरी करून स्वतःचा जीवनावश्याक खर्च सुद्धा भागविला पालकांवरील भार कमी केला.
अमेरिकेतील कोविड पार्श्वभूमीवर लॉकडावून मध्ये ऑनलाईन अभ्यास करताना जेकब, टर्नर अशा कन्स्ट्रक्शन मधील जागतिक दर्जाच्या कंपनी मध्ये आंतरवासिका (internship) होम फ्रॉम वर्क व साईट अशा दोन्ही ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थिती पूर्ण केली.

युनिव्हर्सिटी मधील या मिळविलेल्या यशामुळे त्याला कन्स्ट्रक्शन मधील जागतिक दर्जाच्या कंपनीने त्याची क्षेत्रीय अधिकारी ( field officer) म्हणून नियुक्ती केलेली आहे.
क्षेत्र कोणतेही असो आत्मविश्वास,आत्मीयता,आणि मेहनत यावर ते अधोरेखित करता येते ही आई, वडील ,आणि गुरू आणि घालून दिलेल्या पाऊल वाटेवर प्रवास करून मला परदेशात यशस्वी होवून माझ्या मायभूमीचे देशाचं नाव उंचवायच आहे असा त्याचा मानस आहे.
लहानपणापासून सर्व क्रीडा प्रकार विशेषतः पोहणे,वाचन, आणि इतर सर्व उपक्रमात हिरीतीने सहभागी होत असल्याचा मला त्याठिकाणी चांगला फायदा झाला असेही तो म्हणाला,सिंधुदुर्गातील परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनासाठी आपल्याशी संपर्क साधल्यास योग्य मार्गदर्शन मी करेन असेही म्हणाला.
त्याच्या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून विशेषतः सारस्वत बँक, मराठा समाज सिंधुदुर्ग ,मराठा मंडळ ठाणे, जूनियर कॉलेज कसाल प्राध्यापक वर्ग ,मित्र मंडळी हितचिंतक व राजकीय लोकप्रतिनिधी यांचेकडून सत्कार करून कौतुक करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =