माणुसकीचा ओलावा ” त्या” कुटुंबांनी अनुभवला!
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा पदाधिकारी भाई सावंत, सुप्रिया वालावलकर,तसेच रोटरीचे उदय जांभवडेकर आदी मान्यवर मदतीसाठी पुढे आले
भाजपा आणि रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल कडून रोख स्वरूपात मदत
सिंधुनगरी प्रतिनिधी
निसर्गाने भर पावसात राहत्या घराचे छत्र जमीनदोस्त केल्यामुळे ओरोस ख्रिश्चन वाडी येथील ती आठ कुटुंबे कोलमडून गेली. आपला घर संसार पुराच्या पाण्यात घर कोसळून मातीत गाडला गेल्यामुळे फक्त अंगावरील कपड्यात रस्त्यावर आले! या कुटुंबातील २१ जणांची केविलवाणी अवस्था झाली. ही दुर्दैवी व भावनिक परिस्थिती लक्षात येताच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत,सुप्रिया वालावलकर, रोटरीचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस,उदय जांभवडेकर आदी मान्यवरानी केलेली मदत माणुसकीचा ओलावा दाखवणारी ठरली!
या वाडीतील कांशीराम भगवान भोगले, सुरेश शिवराम भोगले, फ्रान्सिस घाबरियल फर्नांडिस, फ्रान्सिस बावतीस फर्नांडिस, बेनेत अगस्तीन फर्नांडिस, शरद तातोबा परब, राधाबाई विशाल भोगले, प्रभावती शांताराम भोगले या आठ कुटुंबांची घरे जमीन दोस्त झाली २१ जण महिला मुलांसह बाधित झाले. या भर पावसात ना घर ना कपडे ना अन्नधान्य! सर्वच मातीमोल झाले.
या कुटुंबांना सावरण्यासाठी या मान्यवरानी एकत्र येत प्रति व्यक्ती जीवनावश्यक वस्तू कपडे अंथरून पांघरून यासाठी प्रत्येक व्यक्ती पाच हजार रुपये अशी रोख स्वरूपातील मदत या कुटुंबातील २१ व्यक्तींना सोमवारी सायंकाळी दीली. ही मदत भाजपच्या वतीने करण्यात आली.याशिवाय काल रात्री भाजपाचे श्री निलेश राणे यांनी संबंधितांना भेट देवून मदत केली होती. यासोबत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने गरजूंना गॅस शेगडी व संसारपयोगी भांडी यांचीही मदत उद्या केली जाईल असेही सांगण्यात आले.
भाजप नेते खासदार नारायण राणे यानी सोमवारी पूरबाधितांची भेट घेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या पुर परिस्थीची दखल घेत अधिवेशन काळातून संपर्क साधला.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टीने या कठीण प्रसंगी मदत कार्य करावे व या कुटुंबांना धीर द्यावा. शासकीय पातळीवरील तातडीने पोचेल पण आपल्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबांना आधार द्यावा अशा सूचना नामदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचेही प्रभाकर सावंत म्हणाले.
यावेळी ओरोस मधील मान्यवर नागरिक,पूरग्रस्त मंडळी तसेच रोटरीचे नवीन बांदेकर,अरुण मालणकर आदी उपस्थित होते.
_____________________________
*संवाद मिडिया* Advt
💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*