You are currently viewing सावंतवाडी मतदार संघ पंधरा वर्षे विकासापासून वंचित

सावंतवाडी मतदार संघ पंधरा वर्षे विकासापासून वंचित

*उमेदवारी कोणालाही द्या,दीपक केसरकर यांना नको*

 

*राजन तेली यांचे भावनिक आवाहन*

 

सावंतवाडी :

 

दीपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी मतदारसंघ पंधरा वर्षे मागे गेला, असा पुनरुच्चार करताना सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी कुणालाही द्या, दीपक केसरकर यांना देऊ नका असे भावनिक आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले. शिक्षण खातं त्यांना कळलं नाही. मंत्रीपदावरून दीपक केसरकर यांना बाजूला करा अशी मागणी आपण करणार आहे, असेही तेली म्हणाले.

सावंतवाडीतील आपल्या जनसंपर्क कार्यालयात राजन तेली यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजन तेली यांची भाजपामधून हकालपट्टी करा अशी मागणी आपण भाजपा पक्षश्रेष्ठींकडे करणार असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर तेली यांनी दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला.

नव्या नव्या प्रकल्पांची घोषणा करणे, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलांना जर्मनीला नोकऱ्या देणार असं सांगितलं जातं, रोजगार निर्मितीसाठी चष्म्याचा कारखाना आणला होता, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं होतं. सेट टॉप बॉक्स वाटप, असे अनेक प्रकल्प निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सरकार जाहीर करतात.

शिक्षण मंत्री असताना मुलं मात्र शिक्षणासाठी गोव्यातील शाळेत दाखल होतात, शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे, काही शाळा बंदही पडल्या. शाळेच्या इमारती कोसळताहेत, मोडकळीस आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू असताना, लोकप्रतिनिधी म्हणून मी गप्प कसा बसणार? माझा व्यक्तिगत संघर्ष नाही, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हायला हवा, दीपक केसरकर यांच्यामुळे पंधरा वर्षे हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणालाही द्या, मात्र दीपक केसरकर यांना देऊ नका असे भावनिक आवाहन राजन तेली यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा