You are currently viewing पंढरपुरात थांबलेल्या ट्रकला जीपची धडक

पंढरपुरात थांबलेल्या ट्रकला जीपची धडक

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडच्या चार जणांचा जागीच मृत्यू

पंढरपूर
कासेगाव ( ता. पंढरपूर) येथील ७ वा मैल परिसरातील पंढरपूर – सांगोला रोडवर थांबलेल्या ट्रकला चारचाकी गाडीने धडक दिली. या अपघातात कोदाळी (ता. चंदगड, कोल्हापूर) येथील चार जणांचा जागीच मृत्यू झालाची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

जी जे ०३ डबल्यू ९३५५ या क्रमांकाची ट्रक गुजरातवरून येत होती. यावेळी चंदगड ( कोल्हापूर) येथून येणारे के ए ०४ एम बी ९४७६ या क्रमांकाची गाडी त्यांना धडकली. यामध्ये १ पुरुष, २ महिला, १ लहान मुलगी असे ४ जण जागीच मयत झाले. १ पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ खरात यांनी घटनास्थळी भेट दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − five =