You are currently viewing ‘ठाकरे सरकार मुंबई विकायला निघालं आहे’ – प्रवीण दरेकर

‘ठाकरे सरकार मुंबई विकायला निघालं आहे’ – प्रवीण दरेकर

सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम सरकारकडून सुरू आहे..

मुंबई:

सुमारे २ हजार वर्षांपूर्वीच्या लेणी व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार करणाऱ्या ठाकरे सरकारच्या बेकायदेशीर कृतीचा आज भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला.  महाविकास आघाडी सरकारने अंधेरी येथील महाकाली लेणी बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाकाली लेणी येथे सरकारच्या आंदण देण्याच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा नेते किरीट सोमैय्या हे देखील उपस्थित होते.

“ठाकरे सरकार मुंबई विकायला निघालं आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणाऱ्याला, चाळीत राहणाऱ्याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतू सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.” असे धारदार शब्दांचा मारा प्रविण दरेकर यांनी ठाकरेंवर केला आहे.

सत्तेत आल्यापासून सरकार मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजपा नेहमी जनतेच्या पाठीशी आहे. म्हणूनच इथल्या नागरिकांवर अन्याय होत असताना आम्ही येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा