ओरोस येथे महामार्गावर पाण्याचा लोंढा वाहतूक विस्कळीत : अनेक घरांनाही पाण्याचा वेढा….
सिंधुदुर्ग,
मुसळधार पावसामुळे ओरोस ख्रिश्चनवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. तर महामार्गावरून पाण्याचा लोंढा वाहत असल्याने येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे. आज पहाटेपासून पडत असलेल्या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली आहे. दरम्यान कसाल पुलालगतच्या डोंगरातील माती रस्त्यावर असल्याने महामार्गावरील कसाल येथील गोवा ते मुंबई या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्ग ठेकेदाराने यंत्रसामग्रीच्या साहाय्याने येथील माती बाजूला केल्यानंतर वाहतूक पूवर्वत झाली आहे.
सध्या ओरोस ख्रिश्चनवाडी परिसरात पाणीच पाणी अशी स्थिती असून अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे. तर महामार्गावरील वाहतूकही सध्या ठप्प आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून इथल्या नागरिकांनी सुरळीत स्थळी स्थलांतर केले आहे. तर काही काही नागरिक अद्यापही घरात अडकून पडले आहेत. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन व नागरिक मदत कार्यासाठी बाहेर पडले आहेत. महामार्गाच्या दुतर्फा भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ओरोस येथील महामार्गावर पाणी आल्याने पोलीस प्रशासनाने येथील वाहतूक मुख्यालय सामाजिक न्याय भवन मार्गे जिजामाता चौक या मार्गे वळवली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.