You are currently viewing प्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन*..!

प्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन*..!

*प्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन*..! ”

एसटी महामंडळाच्या निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत.

वैभववाडी

एस.टी.प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी जाहीर केली आहे.
एसटी महामंडळाच्या या ग्राहकाभिमुख निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने स्वागत केले आहे.
या दोन दिवशी एसटीचे जिल्हा
प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या
दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. ही अभिनव योजना १५ जुलैपासून सुरू होणार आहे. प्रवासी, प्रवासी ग्राहक संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी आपल्या समस्या-तक्रारी,
सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित
आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. “प्रवासी राजा दिन” कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या, त्या वेळी जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्ररीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.
एसटीच्या विविध बसेस मधून प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे अशी किमान अपेक्षा एसटी प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवासी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. अर्थात, प्रवाशांचे महत्तम समाधान हा उद्देश ठेऊन येत्या १५ जुलैपासून ” प्रवासी राजा दिन ” या अभिनव योजनेचे सर्व एसटी डेपोत आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व प्रवासी बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन एसटी महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा