नाशिक :
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, लेखिका, कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, निवेदिका, कथाकार, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव यांचे प्लास्टिक प्रदूषण दूर करु या! हे प्रबोधन गीत, नाशिक आकाशवाणी वर बुधवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ७.५० वाजता प्रसारित होणार आहे. तरी आपण सर्वांनी ऐकावे.व इतरांनाही ऐकण्यास सांगावे.रसिक श्रोत्यांना हे प्रबोधन गीत नक्कीच आवडेल.
कवयित्री अनुपमा जाधव यांचे समुद्रसंगीत, वहिवाट, रानझरा, अनुबंध ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर आगामी पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत.शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यासाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.तसेच राज्य स्तरावर निबंध व काव्यलेखन ,गायन स्पर्धेत, जिल्हा स्तरीय निबंध व काव्यलेखन व गायन स्पर्धेत त्यांना आजवर अनेक पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत.
स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीतांची त्यांनी निर्मिती केली असून, डहाणू नगरपरिषदेच्या घंटागाडीवर त्यांचें गीत वाजवले. साहित्यिक कार्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.स्वच्छ भारत अभियान, या विषयावर त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.तसेच प्रबोधन गीतांची निर्मिती केली आहे.
घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, पर्यावरण जनजागृती उपक्रम, पर्यावरण संवर्धन, घोषवाक्य, निबंध लेखन, काव्यलेखन, चारोळ्या, पथनाट्य लेखन व सादरीकरण केले आहे
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पाणी बचत, वन्यजीव, प्राणी वाचवा,झाडे लावा, झाडे जगवा.
तसेच राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत देखील त्या पर्यावरणाचे कार्य करतात.
तसेच मुंबई आकाशवाणी व रेडिओ एफ.एम.वर देखील त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
अनुपमा जाधव यांचे अभिनंदन होत आहे.