राज्यातील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

राज्यातील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

मुंबई :

महाराष्ट्र सरकारने बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात बारावीच्या परीक्षांचा प्रश्न प्रलंबित असल्याने 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

काल मोदी सरकारने सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले होते.

 

 

 

 

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सफल चर्चा होऊन राज्यातील बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यावर एकमत झाला आहे.

शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल.त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोना संकटात परिक्षा रद्द कराव्यात ही राज्य सरकारची सुरुवातीपासूनची भुमिका होती.

केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्याने आज सरकार देखील विद्यार्थी नाहीत आणि लवकरच योग्य निर्णय घेईल असे प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा