You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थीनींनी व्हिलचेअर दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून उपलब्ध

सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थीनींनी व्हिलचेअर दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून उपलब्ध

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थीनींनी व्हिलचेअर दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून उपलब्ध करून दिली. त्यासाठी माजी नगरसेविका सौ किर्ती बोंद्रे व किशोर बोंद्रे यांचे सहकार्य लाभले.

बावळट येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम यांनी काल बुधवारी सामाजिक बांधीलकी संघटनेच्या रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून सातोळी गावातील रहिवासी इयत्ता आठवीमध्ये शिकणारी १४ वर्षीय पुण्याई कांबळे ही मुलगी दिव्यांग असून तिला शाळेत जाण्यासाठी व्हीलचेरची आवश्यकता आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आपल्या कारणाने ही गरज तिचे पालक पुरी करू शकत नाहीत. गेले कित्येक वर्ष त्यांची मुलगी या सोयी पासून वंचित असल्याने तिचे खूप हाल होत आहे तरी आपण आपल्या सामाजिक बांधिलकी कडून व्हीलचेअर साठी काही मदत कराल तर त्या कुटुंबावर आपले फार उपकार होतील अशी त्यांनी सामाजिक बांधिलकीला विनंती केली होती.
या विषयाचे गांभीर्य जाणून सामाजिक बांधिलकीच्या माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे व त्यांचे मिस्टर किशोर बोंद्रे यांनी सदर मुलीला व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन एक चांगल्या क्वालिटीची महागडी आधुनिक व्हीलचेअर खरेदी करून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्या जवळ दिली.
यासाठी सालाईवाडा येथील एस, के, सर्जिकल यांचे ही मोठे सहकार्य लाभले.
आज गुरुवारी आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका अनघा मोडक यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे यांच्या शुभ हस्ते सदर दिव्यांग पुण्याई कांबळे या विद्यार्थिनीला अत्याधुनिक अशी व्हीलचेअर सुपूर्त करण्यात आली.सामाजिक बांधिलकीच्या अशा प्रकारच्या सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य उपक्रमाबाबत माहिती घेऊन अनघा मोडक यांनी सामाजिक बांधिलकीच्या या वाखण्या जोगे कार्याचे तोंड भरून कौतुक केले व सामाजिक बांधिलकीच्या या कार्याचा इतरही लोकांनी बोध घेऊन अशाच प्रकारे दीनदुबळ्यांना मदत करावी असे नम्र आवाहन करून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी संघटनेचे अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, समीरा खलील, हेलन निबरे, रूपाली मुद्राळे, कीर्ती बोंद्रे, प्रा. रुपेश पाटील, माजी प्रा. सुभाष गोवेकर , पत्रकार संतोष सावंत, प्रवीण सूर्यवंशी, विदेश सावंत, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =