You are currently viewing विद्यामंदिर परुळेची अर्पिता सामंत फेरतपासणीत दहावी मध्ये राज्यात प्रथम.

विद्यामंदिर परुळेची अर्पिता सामंत फेरतपासणीत दहावी मध्ये राज्यात प्रथम.

*विद्यामंदिर परुळेची अर्पिता सामंत फेरतपासणीत दहावी मध्ये राज्यात प्रथम.*

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च 2024 उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. या पुनर्मुल्यांकनानंतर ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० गुण (१००%) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे शंभर टक्के गुण झाल्याने ती राज्यात प्रथम आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा