लाडकी बहीण योजनेचे दाखले वितरीत करण्यासाठी महसूलकडून तारखा जाहीर…
सावंतवाडी तहसिलदार कार्यालयाचा पुढाकार; सर्वांना वेळेत दाखले मिळण्यासाठी निर्णय…
सावंतवाडी
शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे तालुक्यातील इच्छुक महिलांना तात्काळ मिळावीत यासाठी सावंतवाडी तहसिलदारांच्या माध्यमातून तारखा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्या तारखेनुसार संबंधित गावच्या महिलांना दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे. एकाच वेळी सर्व गावातील महिला येवून कामावर ताण येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
यात उद्या ता. ३ ला सावंतवाडी शहर माजगाव, चराठे, आंबेगाव, बांदा, डेगवे, विलवडे आजगाव, आरोंदा, मळेवाड आंबोली, दाणोली, मडुरा, दांडेली, निरवडे, मळगाव, नेमळे, माडखोल, कलंबिस्त, इन्सुली, निगुडे. ता.४ ला सावंतवाडी ग्रामीण, कोलगाव, कुणकेरी, वाफोली, ओटवणे, तांबुळी, तिरोडा, भटपावणी, चौकुळ सांगेली, पाडलोस, न्हावेली, सोनुर्ली, ब्राह्मणपाट, तळवडे, कारीवडे, शिरशिंगे, क्षेत्रफळ, रोणापाल तर ५ ला गाळेल, सरमळे, असनिये, तळवणे, केसरी, सातार्डा, आरोस, कुंभारवाडा, ओवळीये, पारपोली निरुखे, वेर्ले, कुंभार्ली, वेत्ये, कास आदीं गावांचा समावेश आहे. दरम्यान ठरवून दिलेल्या दिवशी संबंधित लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.