निगडी – (प्रतिनिधी )
यंदा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखीमध्ये सहभागी वारकरी वर्गाची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार या मोफत शिबिरात यावेळी निगडी येथे पोलीस नागरिक मित्र दक्षता संघातर्फे नियोजन पूर्वक करण्यात आली.
प्रतिवर्षाप्रमाणे प्राधिकरणातील सेवाभावी डॉक्टर मा. अभिनंदन कुमठेकर आणि डॉक्टर मा. उमेश पोरे यांनी व्यक्तीशः वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. शनिवार दिनांक २९ जून रोजी झालेल्या या एक दिवसीय शिबिरासाठी अ़ॅड. रमेशअण्णा उमरगे, पवनेचा प्रवाह चे ज्येष्ठ संपादक श्री. शिवाजी शिर्के, संस्थेचे संस्थापक सचिव मा. मनोहर दिवाण, माजी नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे,सामाजिक कार्यकर्ते ओंकार पवळे, महा लिंग चिवटे, राम सपाटे, संजय गारोळे, कुमार हेरंब कुमठेकर आणि अन्य सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.शेकडो भाविकांनी या शिबीराचा लाभ घेतला. शहरातील अनेक मान्यवरांनी या शिबीरास भेट दिली आणि उपक्रमाची प्रशंसा केली.