You are currently viewing माजगाव ग्रामस्थांचे उद्यापासून बेमुदत उपोषण 

माजगाव ग्रामस्थांचे उद्यापासून बेमुदत उपोषण 

माजगाव ग्रामस्थांचे उद्यापासून बेमुदत उपोषण*

सावंतवाडी

माजगावसारख्या महत्वाच्या ग्रा.पं.चे ग्रामविकास अधिकारी पद वर्षभर रिक्त आहे. याचा ग्रा.पं.च्या प्रशासकीय कामकाजासह गावाच्या विकासकामावरही परिणाम झाला आहे. याबाबत अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधून व उपोषणही छेडूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी पं. स. कार्यालयासमोर २ जुलै रोजी माजगाववासीयांसह बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वजरे आणि सर्व ग्रा.पं. सदस्यांनी दिला आहे. यापूर्वीचे ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी यांची मे २०२३ मध्ये आंबोली गेळे येथे बदली झाली. त्यानंतर चराठा ग्रामविकास अधिकारी श्रद्धा तेंडोलकर यांच्याकडे आठवड्यातून दोन दिवस या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. चराठासह या मोठ्या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार त्यांनी आठ महिने सांभाळला. मात्र, या ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामाच्या वाढत्या व्यापामुळे त्यांनी आपली बदली करून घेतली. त्यानंतर गेल्या जानेवारीत न्हावेली ग्रामसेवक राजेश परब यांच्याकडे या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीचा कारभार हाकताना त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. माजगाववासीयांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अनेकवेळा लक्ष वेधण्यात आश्वासनापलीकडे आले. परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाज हाकणे अवघड झाले असून ग्रामस्थांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरी सुविधा अंतर्गतविविध विकासकामांसह पंधराव्या वित्त आयोगाच्या मंजूर आराखड्यातील विकासकामे पूर्ण करताना विलंब होत आहेत. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत. रिक्त पद भरण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येते. मात्र, केवळ आश्वासनपलीकडे कार्यवाही होत नाही. उपोषणावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दहा दिवसात ग्रामविकास अधिकारी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेसह माजगाव ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा