You are currently viewing जान्हवी कुकरेजाची हत्या…

जान्हवी कुकरेजाची हत्या…

1 जानेवारीच्या मध्यरात्री १९ वर्षांच्या जान्हवी कुकरेजा मुंबईत हत्या करण्यात आली. ही घटना खार परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली.

जान्हवीच्या वडिलांचा वाढदिवस असल्यामुळे १ जानेवारी रोजी ती रात्री १२.१५ मिनिटांपर्यंत घरच्यांसोबत होती. नंतर शेजारच्या ओळखीतल्यांसोबत इमारतीच्या गच्चीवर पार्टीसाठी गेली. तिथून येऊन ओळखीतल्यांनी पहाटे पाचच्या सुमारास घरच्यांना जान्हवीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. जान्हवीच्या मृत्यूचे वृत्त कळताच घरच्यांना धक्का बसला. घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन हत्येचा संशय व्यक्त केला आणि तपास सुरू केला. यानंतर २४ तासांच्या आत दोन जणांना अटक करण्यात आली.

*सीसीटीव्ही फूटेज आणि प्राथमिक चौकशीतून हाती आलेल्या माहितीआधारे पोलिसांनी केली कारवाई*

पोलिसांनी जान्हवीच्या मृत्यूनंतर इमारत परिसरातले सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा निर्णय घेतला. या फूटेजमध्ये एक तरुण इमारतीच्या आवारातून पळून जात असताना दिसला. या तरुणाच्या शर्टच्या अवस्थेवरुन इमारतीच्या आवारात संघर्ष झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. फूटेजमध्ये तरुणाची पत्ता शोधण्यासाठी चौकशी सुरू केल्यावर बरीच माहिती हाती आली.

शेजारी राहणाऱ्या मुलीने जान्हवीला पार्टीसाठी गच्चीवर नेले होते. तिथे एक मुलगा पार्टी मूडचा गैरफायदा घेत काही मुलींच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारामुळे जान्हवी नाराज झाली. तिने आपली नाराजी व्यक्त केली. पण तरुणाने जान्हवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जान्हवीने शर्ट खेचून मुलाला मुलींपासून दूर राहण्यास बजावले. जान्हवीच्या या कृतीने नाराज झालेल्या तरुणाने जान्हवीची हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. लवकरच संपूर्ण प्रकार उघड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

कोरोना संकटामुळे रात्रीची संचारबंदी असताना खार परिसरात इमारतीच्या गच्चीवर दारूचे सेवन आणि पार्टी सुरू होती. भगवती हाइट्स इमारतीच्या गच्चीवर पार्टी सुरू होती. ही पार्टी थांबवण्यासाठी कोणीही आले नाही. पार्टीत एक तरुण मुलींच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकाराला जान्हवीने विरोध केला. या विरोधामुळे नाराज झालेल्या तरुणाने केस ओढून दूर नेले आणि मारझोड केली. यानंतर तरुण जान्हवीला घेऊन गच्चीतून खाली आला. इमारतीच्या सीसीटीव्हीत हाच तरुण पळून जाताना दिसत आहे आणि त्याच्या शर्टच्या अवस्थेवरुन त्याच्यावरील संशय आणखी भक्कम झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =