You are currently viewing शिवशंभु संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शिवशंभु संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा शिवशंभू संघटनेच्यावतीने कनेडी हायस्कूल मधील गरीब, होतकरू, अनाथ विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .

हा कार्यक्रम शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विक्रांत सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, संपर्क प्रमुख उमेश मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अमर सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष योगेश गावकर, तालुका संघटक अनुज सावंत, सदस्य नितीन कांबळी, कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बुराण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 13 =