You are currently viewing पेंडुर-पराड येथील ग्रामस्थांनी कट्टा काळसे मुख्य रस्त्यावरील दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून केली साफ

पेंडुर-पराड येथील ग्रामस्थांनी कट्टा काळसे मुख्य रस्त्यावरील दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून केली साफ

मालवण :

 

पेंडुर-पराड येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून कट्टा काळसे मुख्य रस्त्यावरील पेंडूर हद्दीतील दुतर्फा वाढलेली झाडी  श्रमदानातून साफ करण्याचा उपक्रम रविवारी ५ डिसेंबर रोजी राबविण्यात आला. होणारे अपघात रोखण्यासाठी पुढे येऊन दक्षता घेऊन ही साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली होती. या श्रमदान मोहीमेत गावचे उपसरपंच विवेक जबडे, माजी चेअरमन सतीश पाटिल, आतिक शेख, अमित सावंत, सुरेंद्र जबडे, सत्यवान पेंडूरकर, संकेत पाटिल, साहिल पाटिल, अमोल कदम, मकरंद नातू, न्हानु पेंडूरकर, अमित पेंडूरकर, सुमित सावंत यांनी प्रत्येक्षात सहभाग घेतला.

तसेच संजय नाईक सर, दिपा सावंत, आतिक शेख, शेखर फोंडेकर, अजित सावंत, सुभाष सावंत, संतोष हिंदळेकर, शैलेश गावडे, संदीप शिंग्रे, सुशांत परब, अमित सावंत, सुरेंद्र जबडे, सतीश पाटिल, अमित पडावे, हेमंत कनयाळकर, विष्णू पेंडूरकर, विष्णू लाड, विरेश राऊळ, संदीप सावंत, न्हानु पेंडूरकर, राजु पराडकर अश्या अनेकांनी श्रमदान करणाऱ्यांसाठी नास्ता आणि आर्थिक स्वरुपात सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − nine =