अवैद्यरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या २ डंपरवर महसूलची कारवाई…
सावंतवाडी
अवैद्यरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या २ डंपरवर महसूल विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली. यात चालकाकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैधरिता गौण खनिज वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे हे भरारी पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे. ही कारवाई आता कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे अवैधरीत्या होणाऱ्या वाहतुकीला आळा बसणार आहे, असे ही ते म्हणाले.