You are currently viewing अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १ रोजी विधानसभेवर छत्री मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १ रोजी विधानसभेवर छत्री मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १ रोजी विधानसभेवर छत्री मोर्चा

ओरोस

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागील दोन अधिवेशनात सरकारने मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅच्युईटी, आहार दरवाढ करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अद्याप पूर्तता न झाल्याने या बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवार १ जुलै रोजी विधानसभेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा नेण्यात येणार आहे. मागील दोन अधिवेशनात सरकारने मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅच्युईटी, आहारदरात वाढ करण्याचे आश्वासन दिले, ५३ दिवसांचा संप करण्यास शासनाने भाग पाडले, तरीही एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मंत्री अदिती तटकरे यांनी आशा कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव सभागृहात आणला जाईल. त्यावेळी अंगणवाडी कर्मचारी यांची मानधनवाढ करण्याचा प्रस्ताव आणून मान्य करून घेणार, असे लेखी आश्वासन देऊनही काहीच केले नाही. पेन्शन, ग्रॅच्युईटीबद्दलचे प्रस्ताव आचारसंहितेनंतर अडकवले गेले, या सर्वांबद्दल जाब विचारण्यासाठी या अंगणवाडी कर्मचारी यांनी सोमवारी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता छत्री घेऊन आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन कृती समितीतर्फे कमल परुळेकर, शालिनी तारकर, रोहिणी लाड, संज्योक्ती शिंदे, किशोरी पारकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा