You are currently viewing वैश्य समाज संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगती करिता एक दिलाने काम करा – श्री श्री वामनाश्रम स्वामी

वैश्य समाज संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगती करिता एक दिलाने काम करा – श्री श्री वामनाश्रम स्वामी

कणकवली

वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या पतसंस्थेच्या शाखा सावंतवाडी कार्यालयाचे स्थलांतर भाट बिल्डींग, मोती तलावासमोर, सावंतवाडी येथे परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजीच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना स्वामीजींनी संस्थेने गेल्या तीस वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्था करत असलेल्या कार्याचा गौरव करून सर्वांनी एकजूटीने, समर्पणभावनेने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता काम करून संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगती करिता एक दिलाने काम करण्याचा गुरूसंदेश सर्वांना दिला. तसेच सर्व समाजाकरिता अर्थसेवे बरोबरच इतर सेवाही संस्थेने त्याच जोमाने कराव्यात अशी आपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेने श्री. वैश्य गुरूमठ काशी करिता रू. १,११,१११/- ची देणगीचा चेक स्वामीजींकडे सूपूर्त केला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेकडे ठेव ठेवलेल्या सभासदांच्या पावतीचे वितरण स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप रा. पारकर यांनी संस्थेच्या कामकाजा लेखाजोखा सादर केला. सावंतवाडी वैश्य समाज तालुकाध्यक्ष श्री. रमेश बोंद्रे व कणकवली वैश्य समाज तालुकाध्यक्ष श्री. सिताराम कुडतरकर
यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांचे स्वागत संस्थेचे संचालक श्री. रमेश भाट यांनी केले तर आभार संचालक श्री. दिपक अंधारी यांनी
मानले. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी वृंद व वैश्य बांधव मोठया संख्येने
उपस्थित होते. ‌

फोटो:सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था शाखा सावंतवाडी कार्यालयाचा शुभारंभ परमपूज्य
श्री श्री वामनाश्रम स्वामीजीच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =