You are currently viewing पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसीची जीभ छाटा आणि पारितोषिक घेऊन जा

पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसीची जीभ छाटा आणि पारितोषिक घेऊन जा

पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसीची जीभ छाटा आणि पारितोषिक घेऊन जा

*आमदार नितेश राणे यांचे आवाहन

*तुमच्यात हिम्मत असेल तर भर चौकात या, भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद दाखवू.!

*हाच प्रकार पाकिस्तान, चीन मध्ये झाला असता तर संसदेने जिवंत ठेवले नसते

कणकवली;
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. या घोषणाचे पडसाद देशभर उमटले असून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी ओवैसी यांना थेट आव्हान दिले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर भर चौकात या. भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ.तर अशा ओवैसी ची जीभ छाटून भर चौकात उभे केले पाहिजे. असे जो कोणी करणार असेल त्यांनी मला भेटावे आणि माझ्याकडून पारितोषिक घेऊन जावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना पॅलेस्टाईनचा जयजयकार केला. हाच प्रकार पाकिस्तान, चीन मध्ये झाला असता तर त्या ठिकाणच्या संसदेने त्यांना जिवंत ठेवले नसते. तेथील नागरिकांनी त्याला ठेचून मारले असते. असे आमदार नितेश राणे म्हणाले. पाकिस्तानच्या संसदेत जर कोणी जय श्रीराम चा नारा दिला असता. वंदे मातरम चा नारा दिला असता. तर ती व्यक्ती जिवंतपणे संसदेबाहेर येऊ शकली नसती. आमच्या संसदेत लोकशाहीची पूजा होते. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्ही चालतो. म्हणूनच विरोधी राष्ट्र असलेल्या,ज्या राष्ट्रांमध्ये अतिरेक्यांचा जय जयकार होतो. निरपराध लोकांच्या हत्या होतात. अशा राष्ट्रांचा जय जयकार करून. दोन पायावर हा व्यक्ती बाहेर येतो. याचा सुज्ञ जनतेने विचार करावा.असे आवाहनही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा