You are currently viewing श्रेष्ठ कोण?

श्रेष्ठ कोण?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*#श्रेष्ठ कोण?*

एकदा मोठ्ठा आवाज आला
स्वयंपाकघरातील भांड्यांचा
विषय होता नेहमीचाच
श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवण्याचा

आपल्या गटात ओढले कढईने
झाऱ्याला तसेच सराट्याला
आपल्याशिवाय कसल्या पोळ्या
पोळपाट म्हणाला लाटण्याला

लहानमोठ्या पातेल्यांचे संगनमत
एकात एक बसले जाऊन
ताट, वाट्या, पेले बाजूला सरले
घाबरून त्यांची एकी पाहून

चमचे म्हणजे चिल्लर पार्टी
म्हणे त्यांना कोण विचारतं!
पण खीर, कढी खातांना
त्यांच्यावाचुनच तर अडतं

हंडे, बादल्या, पिंप म्हणजे
प्रकरण असते मोठे
पाणी घेण्यासाठी लागते
गडवा, डोल, चंबू, छोटे

आणखीही बाकीची भांडी
तावातावाने पुढं सरकली
पण गॅसचं गरजणं ऐकून
जिथल्या तिथेच थबकली

गॅस म्हणाला, भांडता कशाला
स्वयंपाकघरात श्रेष्ठ मीच
माझ्यावाचुन तुमचा स्वयंपाक
होणार नाही कधीच

@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
२४-६-२४

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा