You are currently viewing LPG Cylinder नववर्षात(एल पी जी) गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

LPG Cylinder नववर्षात(एल पी जी) गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

२०२१ या वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज १ जानेवारी २०२१ पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाहीये.

इंडियन ऑईलच्या मते, १ जानेवारी पासून १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव १३४९ रुपये इतका झाला आहे. यापूर्वी हा भाव १३३२ रुपये इतका होता. मुंबईत हा भाव १२९७.५० रुपये इतका झाला आहे.

तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. तसेच प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा आकारला जातो त्यानुसार प्रत्येक राज्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३६.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात या महिन्यात कोणतीही वाढ कऱण्यात आलेली नाहीये. मात्र, गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनवेळा जवळपास १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये इतकी झाली होती. तर ५ किलोच्या लहान गॅस सिलिंडरच्या दरात १८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा