You are currently viewing सेवानिवृत्ती वय साठ वर्षे”

सेवानिवृत्ती वय साठ वर्षे”

“सेवानिवृत्ती वय साठ वर्षे”

… हा दळभद्री निर्णय घेऊ नये..

….. Adv. Nakul Parsekar

… दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधीने मुख्य सचिव यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या मांडल्या. यामध्ये निवृत्तीचं वय साठ ही प्रमुख मागणी होती. याबाबत असे आश्वासन दिले गेले की, निवृत्तीचं वय साठ असावं, ही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल.
निवडणूका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष परिणामांचा विचार न करता वाट्टेल ते निर्णय घेतात. घेतलेले निर्णय किती व्यवहार्य आहेत, याचा जरासुद्धा विचार केला जात नाही.
नव्वदच्या दशकात जागतिक स्तरावर खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे जोरात वाहू लागले. डंकेल प्रस्ताव स्विकारला. याला त्यावेळी संघ परिवाराने जोरदार विरोध केला. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी मजदूर संघाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्याचे आदेश दिले. काँग्रेस सरकारच्या काळात दिल्ली येथे झालेल्या विराट मोर्चात मजदूर संघाचा पदाधिकारी म्हणून मी सुद्धा सहभागी झालो होतो. लाठ्या-काठ्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा जोरदार मारा लाखो कामगारांनी सहन केला. देशातील डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनांनीही याला पाठिंबा दिला. यावेळी भारतीय मजदूर संघाचे चिंतनशील आणि दुरदर्शी नेते श्रद्धेय ठेंगडीजी यांनी दिल्लीतील त्या विराट सभेला संबोधित करताना खुले मुक्त आर्थिक धोरण आणि खाजगीकरण यामुळे भविष्यात या देशात कोट्यावधी बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी वणवण करावी लागेल… आणि ज्यांची रोजीरोटी सुरु आहेत तेसुद्धा बेकार होतील… दुर्दैवाने आज त्यांनी सांगितलेले भाकीत आणि धोका आपण प्रत्यक्ष अनुभवतं आहोत.
माजी पंतप्रधान मा. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत खाजगीकरणाचा वेग आणखीनच वाढला. विरोधी पक्ष म्हणून भाजपा राजकारणाचाच भाग म्हणून विरोध करत होता.. पण गेल्या दहा वर्षात सत्तेत असताना भाजपाने सुध्दा हा वेग दुप्पट केला. अनेक सरकारी उपक्रम अदानी, अंबानीना देवून टाकले.
थोडक्यात शाश्वत सरकारी नोकऱ्या आणि रोजगार मिळणे दुर्मीळ झाले.
गेल्या दहा वर्षांत देशात सुमारे बारा कोटींहून जास्त बेरोजगार रोजगारासाठी वणवण करत आहेत. केंद्र सरकारच्या वा राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या आकर्षक जाहिराती आपण पहातो. बेरोजगारांसाठी स्वतःचा उद्योग करुन आत्मनिर्भर व्हावे. यासाठी देशातील राष्ट्रीयकृत बॅका सहकार्य करतील.. पण या योजनांचा आणि लाभार्थींचा सक्सेस रेट किती? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
महाराष्ट्र हे एकेकाळच प्रगत राज्य, ज्याची आज दुरावस्था आहे. या राज्यात लाखो उच्चशिक्षित तरूण तरुणी रोजगारासाठी वणवण करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कंञाटी कामगार ही या बेरोजगारांचे आर्थिक शोषण करणारी कन्सेप्ट सरकार प्रत्येक क्षेत्रात वापरत आहे. उच्चशिक्षित तरूण अवघ्या आठ, दहा जास्तीत जास्त पंधरा हजाराच्या अल्प मोबदल्यावर काम करत आहे. भविष्यातील कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसताना केवळ वीतभर पोटाची खळगी भरावी म्हणून हा कंञाटी कामगार नियमित कर्मचाऱ्या पेक्षा काकणभर जास्तच काम करतो. लाख दिड लाख पगार आणि इतर सगळ्या सुविधा मिळणाऱ्या नियमित कर्मचाऱ्याच्या कामाचं मुल्यमापन करणारी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही. काही अपवाद वगळता हे नियमित कर्मचारी बहुतेक वेळा या कंञाटी कामगारांकडूनच काम करून
घेतात.
आता या घडीला महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात पोलीस भरती सुरू आहे. अवघ्या सतरा हजार जांगासाठी तब्बल सतरा लाख सत्तर हजार अर्ज आलेले आहेत, ज्यामध्ये चाळीस टक्याहून जास्त उच्चशिक्षित आहेत.
खरतरं वयोमानानुसार माणसाची क्रयशक्ती, आकलनशक्ती व कार्यक्षमता कमी होते. डिजिटल युगात तर वाढत्या वयात गुणात्मक व जलद काम करणे यावर मर्यादा येतात अशावेळी महाराष्ट्र शासन जर निवृत्तीचं वय साठ करण्याचं निर्णय घेत असेल तर या राज्यातील बेरोजगार तरुणांनी याला कडाडून विरोध केला पाहिजे. एका बाजूला लाखो बेकारांच्या झुंडीच्या झुंडी रोजगारासाठी संघर्ष करत आहेत. हाताला काम नाही म्हणून गुन्हेगारीकडे वळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा दळभद्री निर्णय जर शासन घेत असेल तर ते बेरोजगार युवक – युवतींच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा