You are currently viewing नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दिनांक 24 फेब्रुवारी  रोजी सायं.5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात स्वहस्ते सादर करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त, यांनी केले आहे.

             आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा अर्ज प्राप्त झालेली तसेच अपुर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत यांची कृपया नोंद घ्यावी.

            बेरोजगारांच्य सहकारी सेवा सोसायट्याना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्दशाने रु.3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शासन निर्णय दि.11 डिसेंबर 2015 अन्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्रे प्राप्त झालेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा