You are currently viewing महाविकास आघाडीचे नेते प्रवीण भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट..

महाविकास आघाडीचे नेते प्रवीण भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट..

सावंतवाडी

महाविकास आघाडीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज गुरुकुल येथे सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केल्याने सावंतवाडी शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण आले आहे.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यानंतर ते राष्ट्रवादी पासून अलिप्त होते मध्यंतरीच्या काळात त्यांना राष्ट्रवादी पक्षात सामील करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही, आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तर्फे बबन साळगावकर यांना सक्रिय करण्यासाठी आज राज्यमंत्री माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांची गुरुकुल येथे भेट घेऊन राजकीय चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यामुळे भविष्यकाळात बबन साळगावकर हे महाविकास आघाडीचे सावंतवाडी शहराचे प्रमुख सूत्रधार असतील काय असा प्रश्न पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − twelve =