You are currently viewing वीज कंत्राटी कामगारांचे 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन – जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

वीज कंत्राटी कामगारांचे 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन – जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

*वीज कंत्राटी कामगारांचे 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन – जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही या मुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोष ला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ दि 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने करणार आहे याची नोटीस मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा ऊर्जा मंत्री, मा कामगार मंत्री , व वीज कंपनी चे प्रशासन यांना नोटीस दिली आहे अशी माहिती महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.

27 जून2024 रोजी सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी *सरकार जगाओ* आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व मंत्री आमदार व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर विधी मंडळात आवाज उठवून कामगारांना न्याय द्यावा या करिता निवेदन देवून जागृत करणार आहे.

तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांची पगारवाढ करावी, वेतन एक समान करावे, नोकरीत जॉब सिक्युरिटी मिळावी या साठी हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, नवीन भरतीमध्ये कुशल व अनुभवी कामगारांना वयात सवलत, नोकरीत विशेष आरक्षण व प्राधान्य मिळावे या मागण्यावर मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत चर्चा होऊन निर्णय झाले मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने कामगार नाराज आहेत.

त्यामुळे तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडुन सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशना दरम्यान 9 जुलै 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन मध्ये वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवहान करणार असल्याचे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी यांनी केले आहे.

अवर प्रधान सचिव ऊर्जा यांनी हरियाना पटर्न साठी ऑक्टोबर 2023 मध्ये समिती स्थापन केली. ऊर्जामंत्री यांच्या सूचनेनुसार आता त्वरित संघटने सोबत मिटींग घेऊन पुढील आचार संहिता लागण्यापूर्वी सरकारने अंमलबजावणी पाहिजे अशी अपेक्षा उपमहामंत्री राहूल बोडके यांनी व्यक्त केली आहे.

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा