कुडाळ तालुका शाखेची सभा संपन्न….

कुडाळ तालुका शाखेची सभा संपन्न….

कुडाळ

शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२० रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा, कुडाळ तालुका शाखेची सभा संस्थेचे हितचिंतक मा.नंदकिशोर साळसकर आणि कुडाळ तालुका संघटक सौ.नीता साळसकर यांच्या घरी संपन्न झाली.

यावेळी उपस्थित जिल्हा संघटक एकनाथ गावडे, तालुका संघटक आनंद मेस्त्री, श्री. माणगावकर व श्री.तोरस्कर उपस्थित होते. तालुका शाखेच्या गेल्या सहा महिन्यातील कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली. तसेच शाखेमध्ये काही बदल करण्यात येऊन नवीन कार्यकर्त्यांना समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा