*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कलिंदनंदिनी वृत्त*
*सुखात गीत गाउया*
तुझ्या सवे सखे अता नवा वसंत पाहुया
सुरास सूर देउनी सुखात गीत गाउया ||धृ||
अता कशास लाजते अशीच साथ दे प्रिये
तुझ्याविना न साजरा वसंत होतसे सये
फुलाफळात दंगुनी निसर्गराज जाणुया
सुरास सूर देउनी सुखात गीत गाउया ||१||
निळ्या नभांगणी सफेद पुंजके जणू ससा
अवर्णनीय दृश्य की अप्रतिम भास राजसा
अशा अनेक शृंखलांमधेच आज रंगुया
सुरास सूर देउनी सुखात गीत गाउया ||२||
कितीक रंग लेवुनी धरा मही झळाळले
जसे तुझ्या तनास वस्त्र रेशमीच भाळले
मनी वसंत माळुनी सदैव सौख्य मागुया
सुरास सूर देउनी सुखात गीत गाउया..||३||
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६