You are currently viewing देवगड गिर्ये विकास सेवा सोसायटीवर भाजपाचा एकहाती विजय

देवगड गिर्ये विकास सेवा सोसायटीवर भाजपाचा एकहाती विजय

देवगड :

 

देवगड  तालुक्यातील गिर्ये विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आज पार पाडली. आज सायंकाळी झालेल्या मतमोजणी चा निकाल पाहता भारतीय जनता पक्ष पुरस्कृत रामेश्वर-चौंडेश्वरी-रवळनाथ गावविकास सहकार पॅनल चे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत.

महाविकास आघाडी ने सदर निवडणूक प्रतिष्ठेची करून आपले पॅनल देखील या निवडणुकीत उभे केले होते. कार्यसम्राट आमदार सन्मा. नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफभाई बगदादी आणि माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी तसेच गिर्ये सरपंच रुपेश गिरकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सदर निवडणूक भाजपा ने एकहाती जिंकत विरोधी पॅनल चा धुव्वा उडाला आहे.

भाजपाच्या या विजयाने गिर्ये ग्रामस्थांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. आमदार सन्मा. नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी, जी.प. माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, योगेश गिरकर, सचिन गिरकर या सर्वांचे उत्तम नियोजन तसेच संतोष गिरकर, दिलीप गिरकर, सदाशिव पुजारे, नामदेव घाडी, शरीफ खान आणि गिर्ये गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा विजय मिळाला आहे.

पुरळ विभागात पार पडलेल्या तिर्लोट, विजयदुर्ग, पुरळ-हुर्शी, रामेश्वर, आणि गिर्ये या सर्व विकास सोसायटिंवर भाजपा च्या विजयात आरिफभाई बगदादी यांचा सिंहाचा वाटा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा