– जे.डी. नाडकर्णी
कुडाळ
परिवहन मंत्र्यांनी ऑनलाइन कुडाळ एसटी स्टँड चे उद्घाटन घाईगडबडीने करून संपूर्ण कुडाळ वासियांना तसेच स्टैंड वर येणाऱ्या जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील प्रवाशांना उघड्यावर पडले आहे. घाईगडबडीने ऑनलाइन उद्घाटन करून परिवहन मंत्र्यांनी काय साधले आहे हे त्यांचे त्यांनाच माहिती? ऑनलाइन स्टॅन्डचे उद्घाटन करून परिवहन मंत्र्यांनी कुडाळ जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याचे टाळले आहे. पण भविष्यात सिंधुदुर्ग जनता त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.
सुरक्षा भिंत नसलेले तसेच उपहारगृह व अनेक गोष्टी सुरू नसताना अर्धवट असलेल्या एसटी स्टॅन्ड चे उद्घाटन का केले? असलेले जुने एसटी स्टँड तोडून आमदारांना घड्याळ लावायच्या बाल हट्टापायी 2 कोटीची इमारत बांधली गेली का? कुडाळची शोभा ही घड्याळ लावून वाढणारी नसून कुडाळ मालवण मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात रस्ते नीट ठेवलण्या मध्येच आहे. कुडाळ शहरांमध्ये अनेक कामे अशी अर्धवट ठेवली गेली असून त्या त्या ठिकाणी अशी कधीही बंद पडणारी घड्याळ लावून कुडाळच्या सौंदर्यात भर पडणारआहे का? फक्त स्वार्थासाठी कुडाळचे खरे सौंदर्य असणारा जुना एसटी स्टँड जमीनदोस्त करण्यात आला आहे. भविष्यात ज्या ज्या लोकांनी सदर बांधकामामध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्या त्या लोकांना महाराष्ट्र कामगार परिवहन सेना योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा म.न.रा.प.का.से. चे अध्यक्ष जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.