You are currently viewing सावंतवाडीतील युवकाचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सावंतवाडीतील युवकाचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सावंतवाडीतील युवकाचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी :

सावंतवाडी उभाबाजार येथील रहिवासी विशाल नरेंद्र मसुरकर ( ४४ ) यांचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टॅक्स कन्सल्टंट म्हणून ते काम करीत असत. रेल्वे प्रवासात गया रेल्वे स्थानकादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाने मसुरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा