You are currently viewing बांधकाम कामगार यांना लवकरच मिळणार भांडी संच व सुरक्षा संच

बांधकाम कामगार यांना लवकरच मिळणार भांडी संच व सुरक्षा संच

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगारांच्या हितासाठी केल्या अनेक मार्गदर्शक सूचना

कुडाळ :

सध्या पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे जून महिन्याचे अखेर आचारसंहिता संपल्यावर भांडी व कीट वाटप सुरू होणार आहे. भांडी व सुरक्षा संच कीट वाटप हे सिंधुदुर्गनगरी या मुख्यालय ठिकाणी करण्यात येणार आहे. मंगळवार 11 जून रोजी सरकारी कामगार कार्यालय ओरोस येथे सरकारी कामगार आयुक्त श्री आयरे यांच्या समवेत भांडी संच वाटप या विषयी श्रमिक कामगार संघटना व इतर सर्व कामगार संघटना पदाधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली. श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी वेळोवेळी कामगार यांना लाभ मिळावा यासाठी अनेकवेळा पाठ पुरावा करत आहे. निवडणूक पूर्वी बांधकाम कामगार यांना भांडी संच वाटप करण्यात आले होते. परंतु नियोजन अभावी सर्व ठिकाणी भांडी संच वाटप करताना बट्ट्याबोळ उडाला होता. अनेक कामगार यांना भांडी संच मिळाला नव्हता यावेळी कामगार यांची निराशा झाली. सदर बाब प्राजक्त चव्हाण यांनी कामगार अधिकारी यांच्याशी फोन द्वारे कामगार यांना झालेला त्रास विषयी सांगितले होते. तदनंतर निवडणूक आचासंहिते मुळे सर्व काही बंद करण्यात आले. श्रमिक कामगार संघटनेने आचारसंहिता नंतर योग्य नियोजन करण्यासाठी सुचविलेले होते. पुढील संच वाटप करताना येणाऱ्या अडचणी व त्या अनुषंगाने सर्व कामगार संघटना यांच्या समवेत कामगार आयुक्त आयरे यांनी बैठक लाऊन भांडी वाटप व कीट वाटप या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणली. आयुक्त आयरे कामगार यांच्या हितासाठी कायमच पुढाकार करत असतात त्या अनुषंगाने संघटना वतीने अभिनंदन व गौरवोद्गार काढण्यात आले.

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व श्री. साटम यांनी कामगार यांच्या साठी योग्य नियोजन करण्यासाठी अनेक सूचना व मार्गदर्शन केले. मागील वाटप करण्यात आले त्यावेळी ज्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा होऊ नये असे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले. तसेच कीट वाटप करणारी इजन्सी यांनी कामगार यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे तश्या प्रकारची येणाऱ्या कामगार यांची दक्षता व काळजी घ्यावी असे ठणकावून प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले.

पदवीधर मतदार संघ निवडणूक 26 जून ला असल्यामुळे आचारसंहिता संपलेली नाही जून अखेर आचारसंहिता संपल्या वर भांडी व किट वाटप सुरू होणार आहे भांडी व सुरक्षा संच किट वाटप हे जिल्हाच्या ओरोस या ठिकाणी वाटप होणार आहे असे चर्चेअंती ठरविण्यात आले.

सद्य परिस्थितीत आता नवीन नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्ती करण्यासाठीं ऑनलाईन साईट सुरू करण्यात आलेली आहे. मुलांची शिष्यवृत्ती व इतर लाभ काही प्रमाणात मंजुर करण्यात आले आहेत परंतु सदर पैसे बँक खाती अजून जमा झाले नाहीत. त्यासाठी आपल्या कार्यालयातून शासन स्तरावरून पाठ पुरावा करण्यात यावा असेही प्राजक्त चव्हाण यांनी आयुक्त यांचा समवेत चर्चा करताना सांगितले.

तसेच मागील काळातील एकूण 6 हजार कामगार यांना मिळणारे ऑफलाईन लाभ शासनस्तरावर पेंडिंग आहेत. अशी माहिती आयुक्त आयरे यांनी सांगितले. त्यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी सदर कामगार यांचे लाभ पेंडींग आहेत. त्यांची यादी आमच्या जवळ द्या आम्ही कामगार मंत्री श्री. खाडे यांची भेट घेऊन पाठपुरावा करतो असे सांगितले. तदनंतर आयुक्त यांनी सदर यादी तात्काळ उपलब्ध करून दिली.

या वेळी कामगार आयुक्त श्री आयरे, सहाय्यक कामगार अधिकारी हुंबे, श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, श्रमिक कामगार संघटना जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, भांडी व किट वाटप टेंडर घेणारे श्री लवेकर, श्री. साटम, श्री गुरव, श्री. तेली, श्री. साळकर व इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा