You are currently viewing तेजस्विनी आचरेकर यांची राष्ट्रीय तायक्वांडो कॅडेट प्रशिक्षकपदी निवड

तेजस्विनी आचरेकर यांची राष्ट्रीय तायक्वांडो कॅडेट प्रशिक्षकपदी निवड

ओरोस

तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ६ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि ६ वी पुमसे तायक्वॉंडो चॅम्पियनशिप ३० जून ते २ जुलै मुंबई येते संपन्न झाल्या. या स्पर्धेतील सर्व सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांची २७ ते ३० जुलै रोजी लखनऊ येते होणाऱ्या ६ वी राष्ट्रीय तायक्वॉंडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच या महाराष्ट्र कॅडेट गर्ल्स संघला महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून लांजा तालुका सचिव व लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.

त्याच्या या यशाबद्दल तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील,उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा,जिल्हा सचिव लक्ष्मण कररा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे,कोषाध्यक्ष शशांक घडशी,तायक्वॉंडो फिटनेस अकॅडमी लांजा तालुका अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे,कोषाध्यक्ष तेजस दत्ताराम पावसकर, सदस्य रोहीत कांबळे, व लांजातील पालक वर्ग खेळाडूंनी अभिनंदन केले व फूढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा