You are currently viewing दि.३१ डिसेंबरला पवित्र व पर्यटन स्थळे आणि खुल्या मैदानांवरील पार्ट्यांना प्रतिबंध करावा

दि.३१ डिसेंबरला पवित्र व पर्यटन स्थळे आणि खुल्या मैदानांवरील पार्ट्यांना प्रतिबंध करावा

माऊंटेनिअरिंग असोसिएशनची पोलीस अधिक्षकांकडे मागणी.

वैभववाडी.

३१ डिसेंबर २०२० रोजी वर्षअखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील स्थानिकांसह अनेक पर्यटक सज्ज झाले आहेत. पवित्र स्थळे, पर्यटन स्थळे व खुल्या मैदानावर पार्ट्या आयोजित करून वाईट कृत्ये व अस्वच्छता केली जाते. हौसी व्यक्तींसह पर्यटकांकडून अशा स्थळांचे पावित्र्य नष्ट करून शांततेचा भंग केला जातो.जिल्ह्यातील अशा सर्वच स्थळांवर खास लक्ष ठेवून नियमभंग करणाऱ्या व्यक्तींवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
या ३१ डिसेंबरच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये अल्पवयीन मुले देखील सहभागी होतात. यातून त्यांना व्यसन लागण्याची शक्यता असते. या सर्वाचा विचार करून जिल्ह्यातील पवित्र स्थळे,पर्यटन स्थळे व खुली मैदाने येथे होणाऱ्या पार्ट्यांना प्रतिबंध करावा अशी विनंती माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी मेलव्दारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 12 =