You are currently viewing IRCTC चार नव्या वेबसाइटचे आज अनावरण

IRCTC चार नव्या वेबसाइटचे आज अनावरण

नवी दिल्ली
रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता रेल्वेचं तिकीट बुकिंग करणं अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने अजून एक पाऊल टाकले आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची ( IRCTC)वेबसाइट नव्या रूपात दिसणार आहे. नव्या वेबसाइटवर प्रवाशांसाठी अधिक चांगले फिचर्स असतील. या नव्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, IRCTC च्या नव्या ई-तिकिटिंग संकेतस्थळावर आणि एपवर तिकीट बुकिंगमध्ये सर्व सुविधा सहजपणे उपलब्ध होतील.

तत्पूर्वी २०१८ मध्ये IRCTC चे नवे रूप समोर आले होते. तेव्हापासून ही वेबसाइट प्रवाशांच्या सेवेत आहे. म्हणजे प्रवाशांसाठी नव्या वर्षात नव्या वेबसाइटची भेट मिळणार आहे.

IRCTC च्या या नव्या वेबसाइटवर प्रवाशांसाठी अधिक चांगले फिचर्स असतील. तसेच नव्या वेबसाइटवर अधिक लोड पडला तरी ती हँग होणार नाही, असेही IRCTC कडून सांगण्यात आले. एवढेच नाही तर नव्या वेबसाइटमध्ये आधीच्या तुलनेत अधिक अॅडही दिसतील. त्यामुळे IRCTC ला अधिकचा महसूल मिळू शकेल. तिकीट बुकिंगसह जर तुम्हाला जेवण बुक करायचे असल्यास तुम्हाला सहजपणे पर्याय उपलब्ध होतील.

रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन आता नव्या वेबसाइटवर प्रत्येक मिनिटाला १० हजारांहून अधिक तिकीट बुक होऊ शकतील. सध्या सेवेत असलेल्या IRCTC च्या वेबसाइटवर प्रत्येक मिनिटाला कमाल ७ हजार ५०० पर्यंत तिकिटांचे बुकिंग होते. ई तिकिटींग वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या प्रवासासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 4 =